श्रिया पिळगावकरचा रंगीबेरंगी अंदाज; 'मिर्झापूर'च्या स्वीटीचा ग्लॅमरस लूक व्हायरल
किशोरी घायवट-उबाळे
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या खास लूकचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये श्रियाने परिधान केलेला सप्तरंगी प्रिंटेड अनारकली ड्रेस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
रंगीबेरंगी ड्रेससोबत पारंपरिक दागिने आणि आकर्षक हेअरस्टाइलमुळे श्रियाचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
श्रिया पिळगावकरने 'मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमध्ये 'स्वीटी गुप्ता'ची भूमिका साकारली होती.
तिचे हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते.
सीरिजमध्ये तिच्या पात्राचा शेवट दाखवण्यात आला असला, तरी 'मिर्झापूर: द मूव्ही'मध्ये श्रिया पुन्हा 'स्वीटी'च्या भूमिकेत परतली आहे.
फ्लॅशबॅक, अनसीन सीन्स आणि महत्त्वाच्या ट्विस्टमधून चित्रपटात श्रियाचे पुनरागमन दाखवण्यात आले आहे.
४ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर: द मूव्ही'मुळे श्रियाच्या 'स्वीटी'च्या भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.