ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये श्रुती मराठेचा ग्लॅमरस अंदाज; नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष
किशोरी घायवट-उबाळे
अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आली आहे. | (Photo-Instagram/@shrumarathe)
शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये श्रुतीचा एलिगंट अंदाज पाहायला मिळाला.
मोकळे केस आणि हलका मेकअप यामुळे श्रुतीच्या सौंदर्यात आणखी भर पडली. तिच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
ब्लॅक हाय हील्ससह श्रुतीने आपला स्टायलिश अवतार पूर्ण केला. फॅशन आणि ग्रेस यांचा सुंदर मिलाफ तिच्या या लूकमध्ये पाहायला मिळाला.
'प्रीतम अँड पेड्रो' या आगामी OTT मालिकेच्या ट्रेलर लाँचसाठी तिने हा खास लूक केला होता.
या लूकला श्रुतीने डायमंड रिंग्स आणि आकर्षक डायमंड कानातल्यांची जोड दिली होती.
श्रुतीच्या फॅशन सेन्सचे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.