अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या नव्या फोटोशूटमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड आउटफिटमध्ये श्वेताचा हा फ्रेश आणि एलिगंट अंदाज विशेष उठून दिसतोय.
काफ्तान स्टाईलच्या या ड्रेसवरील फुलं आणि पानांची नाजूक प्रिंट तिच्या संपूर्ण लूकला समरी आणि स्टायलिश टच देते.
कमीत कमी अॅक्सेसरीज, सौम्य मेकअप आणि मोकळे सोडलेले लांब केस यामुळे श्वेताचा हा लूक आणखी खुलून दिसतो.
कधी हसतमुख पोझ तर कधी कॅमेऱ्यासमोर सहज अंदाज; प्रत्येक फोटोमध्ये श्वेताचा आत्मविश्वास लक्ष वेधून घेतोय.
वयाला मागे टाकणारा फिटनेस आणि स्टायलिश फॅशन सेन्स यामुळे श्वेता पुन्हा एकदा चाहत्यांकडून कौतुक मिळवत आहे.
वेस्टर्न आउटफिट असो किंवा पारंपरिक लूक, प्रत्येक स्टाईल सहज कॅरी करण्याची श्वेताची खासियत या फोटोशूटमध्येही दिसून येते.
श्वेताच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून तिचा हा एलिगंट लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. | All Photos : Instagram | Shweta Tiwari