परी म्हणू की सुंदरा...! एव्हरग्रीन ब्युटी श्वेता तिवारीच्या अदा पाहून चाहते घायाळ

Mayuri Gawade

टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्री श्वेता तिवारी आज ४५ वर्षांची असली, तरी तिचा लूक पाहता ती अजूनही २५ वर्षांचीच भासते. | सर्व छायाचित्रे : इंस्टाग्राम (श्वेता तिवारी)
श्वेताने तिच्या इंस्टाग्रामवर अबोली रंगाच्या ‘टियर ड्रेस’मधील मोहक फोटो शेअर केले आहेत.
या वेस्टर्न आऊटफिटमध्ये ती खरोखरच एखाद्या परीसारखी दिसत आहे.
तिच्या शरीरयष्टीला आणि व्यक्तिमत्त्वाला हा लूक अगदी साजेसा ठरला आहे.
सटल मेकअप आणि मोकळे केस यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसतेय.
कानातले आणि हातातील सोनेरी कडा या लुकला रॉयल टच देत आहेत.
कॅमेऱ्यासमोर तिचा आत्मविश्वास आणि ग्रेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.
श्वेताने पुन्हा एकदा आपल्या स्टाइल स्टेटमेंटने तरुण अभिनेत्रींसमोर नवीन मापदंड ठेवले आहेत.