बहिणीसाठी भावांची अद्भुत नगरभ्रमंती; पहा जगन्नाथ रथयात्रेचा नेत्रदीपक सोहळा
नेहा जाधव - तांबे
ओडिशाच्या पुरीमध्ये दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीया या दिवशी जगन्नाथ रथ यात्रा अत्यंत भव्य आणि धार्मिक श्रद्धेने साजरी केली जाते. या वर्षी ही यात्रा शुक्रवारी, २७ जून २०२५ रोजी सुरू झाली. | (Photo - Yogesh Tiwari| FB)
ओडिशा राज्यातील पुरी शहरात ही यात्रा अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित केली जाते. जगन्नाथ मंदिरातील भगवान श्रीजगन्नाथ, त्यांच्या भगिनी सुभद्रा आणि भाऊ बलभद्र या तिघांच्या रथांची मिरवणूक भक्तिमय वातावरणात निघते. | (Photo - Yogesh Tiwari| FB)
भक्तगण हे रथ स्वतःच्या हातांनी ओढून श्रीजगन्नाथाचे दर्शन घेण्यास मोठ्या संख्येने येतात. असे मानले जाते की, या दिवशी जो कोणी रथ ओढतो किंवा केवळ दर्शन घेतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्षप्राप्ती होते. | (Photo - Yogesh Tiwari| FB)
ही यात्रा गुंडिचा मंदिरापर्यंत नेली जाते आणि काही दिवसांनंतर तेथून परतवाटही होते, ज्याला बहुधा यात्रा किंवा उलटी रथ यात्रा म्हणतात. | (Photo - Yogesh Tiwari| FB)
भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रेदरम्यान जे रस्ते त्यांच्या भव्य रथांनी पार केले जातात, त्या रस्त्यांची सोन्याच्या झाडूने सफाई केली जाते. त्याला छेरा पहारा विधी म्हणतात. | Photo - (@Geetashloks|X)
ही रथयात्रा देवी सुभद्रा यांच्या नगरभ्रमंतीच्या इच्छेची पूर्तता म्हणून साजरी केली जाते. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा दिव्य सोहळा पार पडतो. | (Photo -@Manishagola123|X)