जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम
Krantee V. Kale
अंड्यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२, सेलेनियम,ल्यूटिन आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व असतात. | All Photos- yandex
हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीराला उर्जा प्रदान होते.
परंतु, जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या.
ज्या लोकांना जास्त प्रमाणात अंडी खाण्याची सवय आहे त्यांना हृदयरोग होण्याचा धोका वाढू शकतो.
जास्त अंडी खाल्ल्याने गॅस, पोटदुखी आणि अपचन यासारख्या पचनाशी संबधित समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना कोणतीही ॲलर्जी असेल त्यांनी अंडी खाणे टाळावे. अन्यथा समस्या आणखी वाढू शकते.
जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढू शकतो.
या समस्यापासून मुक्त होण्यासाठी मर्यादित प्रमाणात अंडी खा.