चांदीचे दागिने घरीच स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धती वापरु शकता. | All Photos- Yandex
एका भांड्यात पाणी आणि बेकिंग सोडा एकत्र करुन मिश्रण तयार करा. यामध्ये दागिने १० ते १५ मिनिटांसाठी भिजवा. नंतर, मऊ कापडाने किंवा ब्रशने हळूवारपणे घासून घ्या. यामुळे डाग दूर होतील आणि दागिने चमकतील.
दागिने स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट देखील प्रभावी आहे. दागिन्यांना टूथपेस्ट लावा आणि मऊ ब्रशने हळूवारपणे घासून घ्या. नंतर, दागिने पाण्याने धुवा.
लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर लावा. यामुळे तुमचे दागिने चमकदार आणि नवीनसारखे दिसतील.
चांदीचे दागिने १० मिनिटांसाठी व्हिनेगरमध्ये भिजवा. व्हिनेगर डाग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तसेच यामुळे दागिन्यांची चमक दीर्घकाळ टिकून राहते.
एका भांड्यात कोमट पाणी घ्या.यामध्ये बेकिंग सोडा आणि अॅल्युमिनियम फॉइलचा तुकडा घालून मिक्स करुन दागिने ५-१० मिनिटांसाठी भिजवा. ऑक्सिडेशनमुळे काळे पडलेले दागिने १५ मिनिटांत चमकतील.
चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी बाजारात खास क्लीनर उपलब्ध आहेत. ते वापरण्यापूर्वी नेहमी लेबल वाचा. हे क्लीनर खास स्टोन असलेल्या दागिन्यांसाठी वापरले जाते.