पाणी बसून प्यावं की उभं राहून? आरोग्यासाठी कोणती पद्धत योग्य, डॉक्टरांनी दिलं उत्तर
Mayuri Gawade
पाणी पिताना बसावं की उभं राहावं, असा प्रश्न अनेकांना पडतो; पण पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे खरंच आरोग्याचं नुकसान होतं का?
उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा संधिवाताचा त्रास होतो, असा समज अनेक लोकांमध्ये आजही प्रचलित आहे.
मात्र, फोर्टिस हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजी तज्ज्ञ डॉ. योगेश छाबडा यांच्या मते, उभं राहून पाणी प्यायल्याने सांध्यांना नुकसान होत असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
मानवी शरीराची रचना अशी आहे की, आपण बसून किंवा उभं राहून अशा दोन्ही पद्धतींनी सुरक्षितपणे पाणी पिऊ शकतो.
सांधेदुखी किंवा गुडघेदुखी होण्यामागे वाढतं वय, अतिरिक्त वजन, आनुवंशिक कारणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांसारखे घटक कारणीभूत ठरू शकतात.
शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण राखल्याने सांध्यांमधील वंगणाचं काम करणाऱ्या द्रवाचं संतुलन राखण्यास मदत होते.
काही लोकांना बसून पाणी पिणं अधिक आरामदायी वाटत असलं, तरी प्रत्येकाने बसूनच पाणी प्यावं, असा कोणताही वैद्यकीय नियम नाही.
बसून किंवा उभं राहून पाणी पिण्यापेक्षा शरीराच्या गरजेनुसार दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिणं अधिक महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होत असल्यास पाणी पिण्याच्या पद्धतीला दोष देण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
| All Photos : AI Generated