दिवाळीच्या धावपळीत चेहरा निस्तेज झालाय? इंस्टंट ग्लोसाठी टोमॅटोचा 'हा' फेसपॅक ट्राय करा

Mayuri Gawade

दिवाळीच्या दिवसांत फराळ, पाहुण्यांची ये-जा, खरेदी आणि प्रवासाच्या धावपळीत अनेकदा चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो आणि त्वचा निस्तेज वाटू लागते.
अशा वेळी त्वचा टवटवीत दिसण्यासाठी अनेकजण घरगुती फेसपॅक वापरतात. टोमॅटोच्या रसापासून तयार होणारा असाच एक फेसपॅक तुम्ही जाणून घेऊ शकता.
हा फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक पिकलेला टोमॅटो स्वच्छ धुवा, त्याचे दोन भाग करा आणि किसणीच्या मदतीने त्याचा गर काढून घ्या.
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे अँटिऑक्सिडंट असते. मात्र, टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग किंवा काळे डाग कमी होतात.
आता टोमॅटोच्या गरामध्ये एक चमचा कॉफी पावडर घाला आणि चमच्याच्या मदतीने दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या. त्यानंतर या मिश्रणात एक चमचा पिठीसाखर घाला. मात्र, साखरेचे कण चेहऱ्यावर घासल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या.
यानंतर मिश्रणात एक चमचा मध आणि एक चमचा तांदळाचे पीठ घालून सर्व पदार्थ एकत्र करा आणि त्याची एकसारखी पेस्ट तयार करा.
यानंतर मिश्रणात एक चमचा मध आणि एक चमचा तांदळाचे पीठ घालून सर्व पदार्थ एकत्र करा आणि त्याची एकसारखी पेस्ट तयार करा.
हा लेप वापरण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूस पॅच टेस्ट करा. त्वचेला त्रास होत नसेल तरी चेहऱ्यावर जोरात मालिश करू नका आणि डोळ्यांजवळ लेप लावणे टाळा.
टोमॅटोचा रस आणि इतर घरगुती पदार्थ प्रत्येकाच्या त्वचेला सूट होतीलच असे नाही. लेप लावल्यानंतर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच धुवा आणि गरज पडल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. | All Photos : AI Generated