Skin Care Tips : उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल चमकदार; अर्ध्या टोमॅटोचा करा असा वापर
Mayuri Gawade
अर्धा टोमॅटोही त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. | सर्व छायाचित्र 'एआय'ने तयार केल्या आहे.
उन्हामुळे काळवंडलेली त्वचा फ्रेश करण्यासाठी टोमॅटोचा फेस मास्क उपयोगी मानला जातो.
टोमॅटोमधील लायकोपीन त्वचेचं UV किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतं.
टोमॅटोचा रस आणि दही एकत्र केल्यास त्वचेला नैसर्गिक पोषण मिळू शकतं.
दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं.
या फेस मास्कमध्ये चिमूटभर हळद घातल्यास त्वचेला अतिरिक्त फायदे मिळू शकतात.
फक्त १० मिनिटांचा हा घरगुती उपाय त्वचेला फ्रेश आणि चमकदार लूक देऊ शकतो.
नियमित वापर केल्यास टोमॅटोचा हा फेस मास्क त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करू शकतो.