थंडीत रात्री मोजे घालून झोपता? मग 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या

Mayuri Gawade

हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यामुळे अनेक जण पाय उबदार ठेवण्यासाठी मोजे घालून झोपतात. मात्र, ही सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
रात्री मोजे घालून झोपल्याने पाय उबदार राहतात. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास आणि लवकर झोप लागण्यास मदत होऊ शकते.
थंडीमुळे अनेकांचे पाय रात्री खूप गार पडतात. अशा वेळी मऊ आणि उबदार मोजे घालून झोपल्याने अस्वस्थता कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.
हिवाळ्यात अनेकांच्या टाचा कोरड्या पडतात आणि त्यांना भेगा पडतात. झोपण्यापूर्वी पायांना मॉइश्चरायझर लावून सुती मोजे घातल्यास त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
ज्या व्यक्तींच्या पायांना जास्त घाम येतो, त्यांनी रात्री मोजे घालणे शक्यतो टाळावे. कारण मोज्यांमध्ये ओलावा साचल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो.
पायांना खाज येणे, त्वचा सोलवटणे किंवा दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या असल्यास पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. तसेच घट्ट मोजे घालणे टाळावे.
मधुमेह असलेल्या तसेच पायांना सूज येण्याचा किंवा रक्ताभिसरणाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी रात्री मोजे घालताना विशेष काळजी घ्यावी.
रात्री झोपताना नेहमी स्वच्छ, कोरडे, मऊ आणि योग्य आकाराचे मोजे वापरावेत. खूप घट्ट किंवा घामाने भिजलेले मोजे घालून झोपू नये.
थंडीच्या दिवसांत मोजे घालून झोपणे बहुतांश निरोगी व्यक्तींसाठी सुरक्षित असते. मात्र, पायांना जखम, संसर्ग किंवा आरोग्याशी संबंधित इतर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. | All Photos : AI Generated