सॉफ्ट अन् ग्लोइंग स्कीन हवीये? झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'या' गोष्टी , दिसेल फरक

Krantee V. Kale

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. म्हणून या ऋतुत त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. | All Photos- Yandex
जर तुम्हालाही हिवाळ्यात सॉफ्ट अन् ग्लोइंग स्कीन हवी असेल तर झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर या गोष्टी नक्की लावा.
झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबजल लावल्याने त्वचा सॉफ्ट होते. गुलाबजल हे नॅचरल टोनर म्हणून देखील वापरले जाते.
झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेट होते आणि चमकते.
हिवाळ्यात मॉइश्चरायजर लावल्याने त्वचा हायड्रेट होते आणि सुरकुत्या कमी होतात.
नारळाचे तेल गरम करुन थंड करा आणि चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग दिसते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर १० ते मिनिटांसाठी मध लावा. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाते आणि त्वचेवर ग्लो येतो.
'व्हिटॅमिन ई' चे कॅप्सुल त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन ई कॅप्सुलचे काही थेंब चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
आठवड्यातून एकदा नारळ, ओट्स आणि गुलाबाचा फेस मास्क वापरा. यामुळे पोअर्स क्लीन होऊन डेड स्कीन निघून जाते
(Disclaimer: या लेखात दिलेले सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. ‘नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)