सोनाक्षीने केला बॉसी लूक!

Swapnil S

सोनाक्षी सिन्हा ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० ला 'दबंग' या चित्रपटामध्ये सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
दबंगमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्या नंतर तिने राउडी राठोर या चित्रपटात पारोची भूमिका साकारलेली आहे.
सोनाक्षी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने लाल कलरच्या सूटमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षांव केला आहे.