'जाईचा रंग तो, तोच चंद्रमेचा...' नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोनाली कुलकर्णीचा पांढऱ्या बनारसी साडीत मराठमोळा थाट
Mayuri Gawade
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
'नटरंग' चित्रपटातील 'अप्सरा आली' या गाण्यामुळे सोनालीला विशेष लोकप्रियता मिळाली आणि चाहत्यांमध्ये ती 'अप्सरा' म्हणून ओळखली जाऊ लागली.
'मितवा', 'हिरकणी', 'पांडू' आणि 'झिम्मा' यांसारख्या चित्रपटांमधून सोनालीने आपल्या अभिनयाची वेगवेगळी रूपं प्रेक्षकांसमोर आणली आहेत.
अभिनय आणि नृत्यासोबतच सोनाली तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते आणि विशेषतः पारंपरिक साड्यांमधील तिचे लूक नेहमीच लक्ष वेधून घेतात.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा रंग पांढरा असल्याने सोनालीने सुंदर पांढरी बनारसी साडी नेसून खास मराठमोळं फोटोशूट केलं आहे.
पांढऱ्या साडीवरील नाजूक सोनेरी नक्षीकाम, गडद जांभळ्या रंगाचा ब्लाऊज, आकर्षक दागिने आणि हातावरील मेहंदीमुळे सोनालीचा पारंपरिक साज अधिक खुलून दिसत आहे.
या सुंदर फोटोशूटला सोनालीने 'जाईचा रंग तो, तोच चंद्रमेचा... नसते मी सांगत कोणता रंग आहे तो आजचा' असं काव्यमय कॅप्शन दिलं आहे.
पारंपरिक मराठमोळा साज असो किंवा आधुनिक फॅशन, प्रत्येक पेहरावात आपली वेगळी छाप पाडणारी सोनाली तिच्या खास स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. | All Photos : Instagram | Sonalee Kulkarni