Sonalee Kulkarni : डेनिमवर पैठणी ब्लेझर अन् नवऱ्यासोबत रोमँटिक पोझ; पाहा सोनालीचा हटके अंदाज

Mayuri Gawade

मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही कायम चर्चेत असते.
सोनालीने नुकतेच पती कुणाल बेनोडेकरसोबतचं एक खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं असून, त्यातील हटके लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
गुलाबी रंगाचा पैठणी ब्लेझर आणि डेनिम जीन्समध्ये सोनालीचा फ्युजन अंदाज पाहून चाहते तिच्या लूकच्या प्रेमात पडले आहेत.
पैठणीची पारंपरिक झलक आणि वेस्टर्न स्टाईलचा सुंदर मेळ साधत सोनालीने आपल्या लूकला वेगळीच ग्लॅमरची किनार दिली आहे.
निळ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये कुणाल बेनोडेकरही तितकाच डॅशिंग दिसत असून, दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली.
एकमेकांच्या साथीने दिलेल्या स्टायलिश पोझमुळे हे फोटोशूट आणखी आकर्षक आणि लक्षवेधी ठरत आहे.
सोनाली आणि कुणालचा हा रोमँटिक तसेच एलिगंट अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'परफेक्ट कपल', 'स्टनिंग', 'गॉर्जियस' अशा कमेंट्स करत चाहते या फोटोशूटवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
All Photo : Sonali Kulkarni | Instagram