Sonalee Kulkarni Look : 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा गुलाबी साडीत नखरा; पारंपरिक लूकवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव

किशोरी घायवट-उबाळे

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयासह सौंदर्यानेही चाहत्यांची मने जिंकत असते.
सोनालीने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या नव्या पारंपरिक फोटोशूटमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती गडद गुलाबी रंगाच्या सुंदर रेशमी साडीत पाहायला मिळत आहे.
या साडीला असलेले सोनेरी काठ आणि नाजूक बुट्ट्यांचे नक्षीकाम तिच्या लूकला खास शाही थाट देत आहे.
गुलाबी साडीसोबत तिने निळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून, या रंगसंगतीमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
गळ्यातील पारंपरिक चोकर हार, कानातील आकर्षक झुमके आणि बोटातील सुंदर अंगठी तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
मोकळे सोडलेले केस आणि कपाळावरील छोटीशी टिकली यामुळे तिच्या मराठमोळ्या लूकला परिपूर्णता लाभली आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात विविध अदा देत सोनालीने कॅमेऱ्यासमोर दिलखुलास हास्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिच्या या पारंपरिक आणि ग्लॅमरस अंदाजाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत असून, गुलाबी साडीतील तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.