'महाराणी ताराराणी' च्या प्रमोशनसाठी सोनाली अन् अक्षयने केला खास लूक

Swapnil S

सोनाली कुलकर्णी आणि अक्षय कुलकर्णी हे दोघे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत
सोनाली आणि अक्षय हे दोघे 'महाराणी ताराराणी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या ते दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
सोनालीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर त्या दोघांचे फोटो शेअर केले आहेत. तिने तपकिरी कलरची साडी नेसली आहे तर अक्षयने क्रिम आणि तपकिरी असा सदरा घातला आहे.
चाहत्यांनी त्या दोघांच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे आणि चित्रपटाबद्दल उसुक्ता दाखवली आहे.