Sonali Bendre Photos : वयाच्या ५१ व्या वर्षीही सौंदर्याचा जलवा; सोनाली बेंद्रेच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा
किशोरी घायवट-उबाळे
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच सोनालीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले असून, तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गळ्यातील जड नक्षीकाम असलेला चोकर हार, मोठे झुमके आणि कपाळावरील नाजूक बिंदी यांमुळे तिच्या लूकला राजेशाही थाट प्राप्त झाला आहे.
या फोटोंमध्ये सोनालीने गडद निळ्या आणि चंदेरी रंगाची सुंदर डिझायनर लेहेंगा-साडी परिधान केली आहे.
या सुंदर आऊटफिटवर तिने घेतलेली जरदोजी आणि सोनेरी काठांची ओढणी तिच्या लूकमध्ये अधिकच भर घालत आहे.
विशेष म्हणजे, निळ्या रंगाच्या या रॉयल आऊटफिटमध्ये सोनालीने हाफ साडी लूक अतिशय सुंदर पद्धतीने कॅरी केला आहे.
हातांमध्ये भरगच्च डिझायनर कडे, बांगड्या आणि आकर्षक अंगठ्या घालून तिने आपला पारंपरिक शृंगार पूर्ण केला आहे.
तिच्या या पारंपरिक आणि एलिगंट लूकवर चाहते फिदा झाले असून, कमेंट्समधून तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक करत आहेत.