Sonali Bendre Fashion : सोनेरी नक्षीकाम, कुंदनचे दागिने अन् नाजूक दुपट्टा; सोनालीचा पारंपरिक लूक चर्चेत
किशोरी घायवट-उबाळे
सोनाली बेंद्रेचा रॉयल लूक! हिरव्या रंगाच्या सुंदर लेहेंग्यात अभिनेत्रीच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत.
सोनालीने गडद हिरव्या रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला असून, त्यावरील सोनेरी नक्षीकाम लक्ष वेधून घेत आहे.
लेहेंग्यावरील ब्रोकेड विणकाम आणि सोनेरी फुलांची नाजूक डिझाइन यामुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत आहे.
पारदर्शक हिरव्या ऑर्गेन्झा दुपट्ट्याच्या सोनेरी एम्ब्रॉयडरी बॉर्डरमुळे सोनालीच्या लूकमध्ये नाजूकपणा आला आहे.
लेहेंग्याला मॅचिंग हिरव्या रंगाच्या चोळीवर गळ्याभोवती आणि बॉर्डरवर सुंदर सोनेरी झरदोजी व बीड्सचे काम करण्यात आले आहे.
सोनालीने केसांची हाफ-अप, हाफ-डाउन स्टाइल केली असून, त्यात वेणी आणि चेहऱ्याभोवती मोकळ्या बटा ठेवल्या आहेत.
केसांमध्ये सजवलेली सोनेरी हेअर चेन तिच्या पारंपरिक लूकला खास उठाव देत आहे.
एकूणच, सोनालीचा हा हिरव्या लेहेंग्यातील अंदाज सणासुदीच्या फॅशनसाठी सुंदर प्रेरणा देणारा आहे.