सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा अंदाज; कर्णफुलं अन् सोनेरी टिशू पैठणीची सोशल मीडियावर चर्चा

किशोरी घायवट-उबाळे

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नव्या साडी लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोनालीने सोनेरी छटांच्या साडीत आपला खास पारंपरिक अंदाज कॅमेऱ्यासमोर खुलवला आहे.
साडीला साजेसे सुंदर कर्णफुले परिधान करत तिने लूकमध्ये दागिन्यांचा नाजूक टच दिला आहे.
सोनालीच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्याने तिच्या या फोटोशूटला खास आकर्षण मिळाले आहे.
मोकळे केस आणि हलका मेकअप यामुळे सोनालीचा हा लूक आणखी खुलून दिसत आहे.
पारंपरिक पेहरावातही साधेपणा आणि एलिगन्सचा सुरेख मेळ तिच्या लूकमध्ये पाहायला मिळतोय.
'नटरंग'मधील 'अप्सरा आली'नंतर मिळालेली 'अप्सरा' ही ओळख सोनालीच्या प्रत्येक मराठमोळ्या अंदाजात पुन्हा जाणवते.
सोनालीचा हा सुंदर साडी लूक सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळवत आहे.