सोनम कपूरने जम्पसूटमधील खास लूक केला शेअर
Swapnil S
सोनम कपूर ही हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. 'सावरीया' हा सोनम कपूरचा पहिला चित्रपट होता.
सोनम कपूर ही बॉलीवूडची फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशनवर सगळे सेलिब्रटी घायाळ झाले आहेत.
सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने त्यामध्ये पिवळ्या कलरचा जम्पसूट घातला आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.