फुलांचा गुच्छ, केक अन् पतीसोबत खास क्षण; स्पृहा जोशीने असा साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो
Mayuri Gawade
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, कवयित्री तसेच निवेदिका स्पृहा जोशीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला असून, या खास दिवसाचे सुंदर फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
१३ ऑक्टोबर रोजी स्पृहाने आपला वाढदिवस हॉटेलमध्ये निवांत वातावरणात साजरा केला असून, खोलीतील गुलाबी-पांढऱ्या फुग्यांची सजावट आणि चॉकलेट केकने लक्ष वेधून घेतलं.
वाढदिवसाच्या निमित्ताने स्पृहाने स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण घालवले असून, 'Trying to find myself again' असं लिहित तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
या खास दिवसाचे क्षण शेअर करताना स्पृहाने पती वरदसोबतचा गोड सेल्फीही पोस्ट केला असून, आयुष्यातील चढ-उतारांमध्ये मैत्री जपण्याबद्दल लिहिलं आहे.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान स्पृहाने कॉफीचा आस्वाद घेतानाचा फोटो शेअर करत आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.
धावपळीच्या आयुष्यात थोडी शांतता शोधताना स्पृहाने गरम चहा आणि खाऊचा फोटो शेअर करत 'Little peace in the chaos' असं कॅप्शन दिलं.
गुलाबी आणि पांढऱ्या फुग्यांनी सजवलेल्या हॉटेलच्या खोलीत स्पृहाने आनंदाचे क्षण टिपले असून, वाढदिवसानिमित्त मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
वाढदिवसानिमित्त मिळालेल्या चॉकलेट केक आणि गोड पदार्थांचा फोटो शेअर करत स्पृहाने आपल्या सेलिब्रेशनमधील गोड क्षण चाहत्यांना दाखवले.
वाढदिवस साजरा करताना स्पृहाने फुग्यांसोबतचा सेल्फी शेअर केला असून, 'मला माझ्या खऱ्या वयाइतकं मोठं झाल्यासारखं वाटत नाही', असं मजेशीरपणे म्हटलं आहे.
वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल स्पृहाने पुन्हा एकदा चाहत्यांचे आभार मानले असून, तिच्या या खास पोस्टमधून सेलिब्रेशनचा आनंद दिसून येत आहे. | All Photos : Spruha Joshi | Instagram