Student Diet: बोर्ड परीक्षा सुरु झाल्या; मुलांच्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, होईल मोठा फायदा

किशोरी घायवट-उबाळे

संतुलित नाश्ता आणि जेवण महत्त्वाचं : विद्यार्थ्यांनी सकाळी नाश्ता करणे आवश्यक आहे. अंडी, ओट्स, दूध/दही यांसारखे पौष्टिक पदार्थ मुलांचा ऊर्जास्तर वाढवते आणि मेंदूला चालना देते. | ((सर्व छायाचित्रे: Yandex))
प्रोटीनयुक्त आहार घ्या : प्रोटीन्स हे मेंदूच्या कार्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचे असतात. अंडी, कडधान्ये, दही, पनीर, बदाम व अक्रोड यांचा आहारात समावेश करा.
मेंदूला फायदा होणारे फॅटस् (ओमेगा‑3) : अक्रोड, तीळ, बदाम, चिया सीड्स, फ्लॅक्ससीड्स किंवा मासे यांमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि लक्ष केंद्रित करता येते.
भाज्या आणि फळांचे नियमित सेवन: संत्री, केळी, पालेभाज्या हे व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवतात, जे मानसिक तणाव कमी करण्यात मदत करतात.
पाण्याचे सेवन आवश्यक: पाण्याचे प्रमाणात सेवन केल्याने मेंदू सतर्क राहून आणि एकाग्रता वाढते. दिवसातून किमान १.५-२ लिटर पाणी प्या.
साखर आणि जंक फूड टाळा : साखरेमुळे ऊर्जा तात्पुरती वाढते आणि पण नंतर कमी होते. त्यामुळे चॉकलेट, जास्त साखर असलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन टाळा.
वेळेवर आहार आणि झोप महत्त्वाची : जास्त वेळ अभ्यास करताना जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. तसेच ७ ते ८ तासांच्या झोपेमुळे मेंदूला माहिती स्मरणात ठेवण्यात मदत होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)