शाइनिंग सिल्कपासून स्टोनवर्क क्रेपपर्यंत...'या' साड्या देतील तुम्हाला ‘Wow’ लूक

नेहा जाधव - तांबे

पार्टीमध्ये उठून दिसायचंय? पारंपरिकतेचा आधुनिक स्पर्श हवा आहे? मग तुमच्यासाठी खास साड्या आम्ही निवडल्या आहेत ज्या कोणत्याही पार्टीत तुम्हाला एकदम शोस्टॉपर बनवतील. | (Photo - Canva)
नेट साड्या हलक्या असतात आणि स्टायलिश लूक देतात. यामध्ये स्लीक बॉर्डर, ब्राइट रंग, आणि सेमी-शिअर पोत तुम्हाला एलिगंट आणि ग्लॅमरस लूक देतात. | (Photo - Canva)
ऑर्गेन्झा हा एक हलका पण उठावदार फॅब्रिक आहे. पारदर्शक पोत, फ्लोवी फॉल, आणि सूक्ष्म झगमगीत डिझाईनमुळे ऑर्गेन्झा साड्या आजच्या पार्टी लुकसाठी सर्वोत्तम निवड आहेत. | (Photo - Canva)
शिफॉनच्या सौम्य प्रवाहात सॅटिनचा मखमली टच मिळाल्यावर जो लूक तयार होतो तो एकदम रिच आणि ग्लॉसी असतो. ही साडी पार्टी लुकसाठी सुपर ग्लॅमरस ऑप्शन आहे. | (Photo - Canva)
जॉर्जेट फॅब्रिक स्टाइल आणि कंफर्ट यांचा सुंदर मिलाफ आहे. हलकासा झरी किंवा सेक्विन वर्क असलेली जॉर्जेट साडी पार्टीसाठी परफेक्ट चॉईस आहे. | (Photo - Canva)
क्रेप फॅब्रिकची गुळगुळीत पोत आणि स्टोनवर्कचा झगमगाट यामुळे ही साडी पार्टीमध्ये एकदम उठून दिसते. नाईट पार्टी, वेडिंग रिसेप्शन किंवा क्लासिक इव्हनिंग लुकसाठी परफेक्ट पर्याय! | (Photo - Canva)
फ्लोरल प्रिंट्स क्लासिक असूनही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये पेस्टल बेसवर सुंदर प्रिंट्स, शिफॉन किंवा ऑर्गेन्झा फॅब्रिकवर डिझाईन असते. हलक्याफुलक्या कार्यक्रमांसाठी ही साडी फ्रेश, यंग आणि आकर्षक लूक देते. | (Photo - Canva)