नवीन घरासाठी स्टायलिश आणि अध्यात्मिक टच हवा आहे? तुमच्यासाठी खास 'देवघरा'चे डिझाईन्स

नेहा जाधव - तांबे

आपल्या घराला जर पारंपरिक लूक द्यायचा असेल तर घरात लाकडी देव्हारा शोभून दिसतो. सुंदर नक्षीकाम असलेला, लहानसा गाभारा, घुमट, घंटा, कपाट आणि दरवाजा अशी रचना असलेला देव्हारा घरात पारंपरिक लुक देतो. | Photo - Canva
भिंतीवर सहज बसणारा, LED लाईट्ससह झळाळणारा हा आधुनिक देव्हारा घराच्या सौंदर्यात भर घालतो. हलकाफुलका आणि कॉम्पॅक्ट असल्याने तो विशेषतः कमी जागेच्या घरांसाठी उपयुक्त ठरतो. | Photo - Design Cafe
भिंतीतच कोरून तयार केलेलं POP किंवा जिप्सम डिझाईनचं मंदिर आधुनिकतेचा स्पर्श असतानाही पारंपरिक सौंदर्याची आठवण करून देतं. त्यातील नाजूक कोरीव काम आणि सुबक रचना पाहताच लक्ष वेधून घेतो. | Photo - Canva
हलकं, स्टायलिश आणि सहज स्वच्छ करता येणारे मॉड्युलर मंदिर हे आधुनिक फ्लॅटसाठी एक आदर्श पर्याय आहे. लाकडी बनावटीमुळे त्याला पारंपरिकतेचा स्पर्श लाभतो. | Photo - Canva
शुभ्र संगमरवरी देव्हारे केवळ पूजेसाठी नव्हे, तर सौंदर्य आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. मजबूत व टिकाऊ असलेल्या या देव्हाऱ्यांची रचना मोठ्या बंगल्यांत आणि प्रशस्त घरांमध्ये विशेष आकर्षण ठरते. | Photo - Pintrest