साखर न वापरता बनवा पौष्टिक सीड्स लाडू; आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

किशोरी घायवट-उबाळे

गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर साखर न वापरता तयार केलेले सीड्स लाडू हा पौष्टिक पर्याय ठरू शकतो.
या लाडूंमध्ये जवस, सूर्यफूल, भोपळ्याच्या बिया, तीळ आणि चिया सीड्स यांसारख्या पौष्टिक बियांचा वापर करता येतो.
या बियांमध्ये प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट्स तसेच विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.
लाडूंना नैसर्गिक गोडवा देण्यासाठी खजूर, अंजीर किंवा मनुका यांचा वापर करता येतो.
सर्व बिया हलक्या भाजून घेतल्याने त्यांचा स्वाद आणि सुगंध आणखी खुलतो.
भाजलेल्या बिया आणि खजूर एकत्र करून त्याचे मिश्रण तयार करा आणि त्याला लाडूचा आकार द्या.
फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे हे लाडू पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवण्यास मदत करू शकतात.
दिवसभरातील छोट्या भुकेसाठी किंवा चहासोबत स्नॅक म्हणून हे लाडू खाता येतात. | www.pikoso.kz
मात्र, पौष्टिक असले तरी लाडूंचे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. विशेषतः मधुमेह असल्यास आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)