शुगर लेव्हल झटपट नियंत्रित करायचीये? 'या' भाज्या जरूर खा!

Krantee V. Kale

साखरेची पातळी म्हणजे शरीरात असलेल्या ग्लुकोजचे प्रमाण. जेव्हा ही ग्लुकोजची पातळी वाढते तेव्हा इन्सुलिन हार्मोन योग्यरित्या कार्य करू शकत नाही. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. | All Photos-Yandex
परंतु, संतुलित आहार घेऊन आणि योग्य भाज्या खाऊन साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
कारल्यामध्ये पॉलिपेप्टाइड-P नावाचं नैसर्गिक घटक असते, जे इन्सुलिनसारखे काम करते. त्यामुळे कारलं नियमित खाल्ल्यास रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहते.
मेथीच्या पानांमध्ये भरपूर फायबर आणि गॅलेक्टोमनन असते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दुधीमध्ये फायबर आणि पाणीचे प्रमाण जास्त असते. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि ग्लुकोजची पातळी संतुलित करण्यास मदत करते. म्हणून, रोजच्या आहारात दुधीचा समावेश केल्यास शुगर लेव्हल नियंत्रणात राहतो.
पालकमध्ये कार्बोहायड्रेट कमी आणि मॅग्नेशियम , आयरनसारखे पोषक तत्व जास्त असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच, पालकमध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे मधुमेहींसाठी ही अत्यंत गुणकारी भाजी आहे.
कोबी ही व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि मिनरल्सने समृद्ध भाजी आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप कमी आहे. यामुळे कोबी खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात आणि साखरेचे प्रमाणही वाढत नाही.
ब्रोकोली मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के फायबर आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. ही भाजी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गोड पदार्थ कमी खा. तसेच, नियमित व्यायाम करा आणि शरीराला आवश्यक पुरेशी झोप घ्या.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)