उसाचा रस पिताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
Mayuri Gawade
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अनेकजण आवर्जून उसाचा रस पितात. पण तो दररोज पिणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
उसाचा रस चवीला गोड आणि खनिजांनी समृद्ध असला तरी त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते.
दररोज उसाचा रस पिल्याने शरीरातील कॅलरीज वाढू शकतात, कारण त्यात फायबरचे प्रमाण कमी असते.
मधुमेह, वजन वाढणे किंवा आतड्यांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी उसाचा रस मर्यादित प्रमाणातच घ्यावा.
रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या उसाच्या रसातील बर्फ आणि स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
अस्वच्छ परिस्थितीत तयार केलेला रस पिल्याने जंतुसंसर्ग, पोटाचे विकार आणि अन्नजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.
मात्र मर्यादित प्रमाणात घेतल्यास उसाचा रस शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक खनिजे पुरवतो.
व्यायामानंतर उसाचा रस नैसर्गिक ऊर्जा देणारे आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करणारे पेय ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तींनी आठवड्यातून २ ते ३ वेळा सुमारे १५० ते २०० मिली उसाचा रस पिणे योग्य ठरू शकते.
बैठी जीवनशैली असल्यास दररोज उसाचा रस पिण्याऐवजी ताक किंवा इतर कमी कॅलरीज असलेले पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते. | Photos : Pinterest