किंग खानची लेक सुहाना खान दिसली मॉडर्न प्रिन्सेससारखी; पाहा सुंदर Photos

Mayuri Gawade

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लाडकी लेक आणि अभिनेत्री सुहाना खान आपल्या स्टायलिश आणि एलिगंट फॅशनसाठी ओळखली जाते. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात तिचा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.
मुंबईत पार पडलेल्या अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या शाही लग्नसोहळ्यातही सुहानाने आपल्या खास अंदाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
या सोहळ्यासाठी सुहानाने प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेला पेस्टल पिंक लेहेंगा वेअर केला होता.
लेहेंग्यावर लिलॅक, ब्लू, आयव्हरी आणि सॉफ्ट ग्रीन अशा पेस्टल शेड्समध्ये केलेली सुंदर फ्लोरल एम्ब्रॉयडरी तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवत होती.
या पिंक लेहेंग्यासोबत तिने गोल्ड झरी बॉर्डर असलेला पिवळा दुपट्टा कॅरी केला होता, ज्यामुळे संपूर्ण लूक अधिक उठून दिसत होता.
सुहानाने या आउटफिटसोबत पेस्टल स्टोन्स असलेले पोल्की स्टाइल ज्वेलरी घातले होते, ज्यामध्ये स्टेटमेंट नेकलेस आणि मॅचिंग इअररिंग्सचा समावेश होता.
मेकअपसाठी तिने सॉफ्ट पिंक आयशॅडो, रोझी चीक्स, मस्कारा लॅशेस आणि न्यूड लिप्स असा ग्लोइंग आणि फ्रेश लूक निवडला.
मिडल पार्टेड ओपन हेअरस्टाईल आणि छोट्या फ्लोरल हेअर क्लिपमुळे सुहानाचा संपूर्ण लूक मॉडर्न प्रिन्सेससारखा दिसत होता. | All Photos : Instagram (Suhana Khan)