Navratri 2025 : भरजरी 'आदिशक्ती' पैठणीत अभिनेत्री सुखदा खांडेकरचा रॉयल लूक
नेहा जाधव - तांबे
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुखदा खांडेकर नवनवीन लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. | (सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम/सुखदा खांडेकर)
ती प्रत्येक सण आणि उत्सवांमध्ये छान लूक करत असते.
आज सुखदा नवरात्री निमित्त केलेल्या लूकमुळे Trending मध्ये आहे.
कारण तिने केवळ रॉयल लूकच केला नाहीये तर या फोटोचे आकर्षण आहे भरजरी 'आदिशक्ती पैठणी'.
या पैठणीच्या पदरावर सुंदर असे आदिशक्तीचे चित्र रेखाटलेले आहे. कमळ, त्रिशूल आणि आदिशक्तीचा सुंदर असा मिलाफ या पैठणीवर दिसत आहे.
आज नवरात्रीचा दूसरा दिवस. आजचा रंग लाल. या निमित्ताने खास देवीचे चित्र असलेली लाल साडी सुखदाने परिधान केली आहे.
हा लूक खुलून दिसण्याचे दुसरे कारण म्हणजे चक्क तिचा पती अभिजीत खांडेकरने तिचे छान फोटो काढले आहेत.