"सुकून का नाम सूना है, वही है तू मेरे लिये", जियाच्या फोटोंनी लावले चार चांद
Swapnil S
प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर ही बिग बॉस ओटीटी सीझन २ मुळे खूप चर्चेत आली होती. तिला बिग बॉसच्या घरात चाहत्यांची फार पसंती मिळाली होती.
नुकतेच जियाने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये तीने क्रीम कलरचा ड्रेस घातला आहे . सोबत गळ्यात डिझायनर नेकलेस आणि हाथामध्ये एक कडा आणि बोटात एक रिंग घातली आहे.
जिया ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटोस आणि व्हिडिओ शेयर करत असते.
जी मेरी हानिकारक बीवी मधील डॉ. इरावती "इरा" पांडे आणि काटेलाल अँड सन्स मधील सुशीला रुहेल सोलंकी "सुशीला" या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. सोनी सब वर "गुड नाईट इंडिया" चे सह-सूत्रसंचालिका म्हणून देखील तिने काम केले आहे.
नुकतीच ती रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासोबत वेड या मराठी चित्रपटात दिसली होती.
जियाच्या प्रत्येक फोटोवर चाहते कंमेंट्सचा वर्षाव करतात. तिचे सोशल मीडियावर 2.5 मिलियन चाहते आहेत.