Summer Drinks: उन्हाळ्यात शरीराला ठेवा हायड्रेट; 'ही' हेल्दी ड्रिंक्स देतील थंडावा
किशोरी घायवट-उबाळे
ताक : उन्हाळ्यात ताक प्यायल्याने पचन सुधारते आणि शरीराला थंडावा मिळतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
लिंबूपाणी : यामुळे व्हिटॅमिन C मिळते आणि थकवा दूर करून शरीर ताजेतवाने राहते.
आंब्याचे पन्हे : हे प्यायल्याने उन्हामुळे होणारा त्रास कमी करून शरीराला ऊर्जा मिळते.
जलजीरा :जिऱ्याचे पाणी पचनासाठी फायदेशीर असून यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो.
कलिंगड ज्यूस : कलिंगड शरीर हायड्रेट ठेवतो आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो.
सत्तू शरबत : भाजलेल्या चण्याच्या पिठापासून बनवलेले हे सरबत शरीराला थंडावा देऊन दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
नारळ पाणी : उन्हाळ्यात महत्त्वाचे मानले जाणारे नारळ पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि इलेक्ट्रोलाइट्स मिळवून देते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)