समर इव्हनिंगसाठी दिसायचंय ग्लॅमरस? फॉलो करा 'या' मेकअप टिप्स

किशोरी घायवट-उबाळे

हलक्या फाउंडेशन आणि हायड्रेटिंग फॉर्म्युलामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.
हेवी ग्लॅमऐवजी हलका आणि स्किन-फ्रेंडली मेकअप यंदा ट्रेंडमध्ये आहे.
स्मज्ड काजळ, ब्लर आयलाइनर आणि न्यूट्रल शेड्समुळे डोळ्यांना एलिगंट लूक मिळतो.
क्रीम ब्लशमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक दिसते आणि लूक फ्रेश वाटतो.
हलका हायलाइटर त्वचेला सॉफ्ट आणि रेडियंट फिनिश देतो.
मॅट लिपस्टिक आता हायड्रेटिंग फॉर्म्युलात उपलब्ध असल्याने ओठ दिवसभर सॉफ्ट राहतात.
स्किनकेअर-इन्स्पायर्ड मेकअपमुळे कमी मेकअपमध्येही स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक मिळतो.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती ही सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. यातून ‘नवशक्ति’ कोणताही दावा करत नाही.)