Beauty Hack : सनबर्न आणि टॅनिंग कमी करायचंय? जायफळाचा घरगुती उपाय ट्राय करा
Mayuri Gawade
उन्हात बाहेर पडल्यानंतर त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्नचा त्रास वाढतो.
सनबर्न झाल्यावर त्वचेची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं.
या समस्येवर उपाय म्हणून घरच्या घरी जायफळाचा लेप वापरू शकता.
अर्धा चमचा जायफळ पावडर आणि तेवढीच कॉफी पावडर एकत्र घ्या.
या मिश्रणात १ चमचा मध घालून त्वचेला हायड्रेशन द्या.
त्यानंतर १ चमचा दही घालून सगळं मिश्रण एकजीव करा.
तयार लेप टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि १० मिनिटे ठेवा.
हलक्या हाताने चोळून पाण्याने धुवून टाका आणि त्वचा मॉईश्चराईज करा.
नियमित काळजी घेतल्यास त्वचेचा टॅन कमी होऊन नैसर्गिक चमक परत येते. | सर्व छायाचित्र : 'एआय'ने बनविली