Summer Special Drink : उन्हाळ्यात फक्त ५ मिनिटांत बनवा बडीशेपचे सरबत; तुम्हाला ठेवेल Cool, रेसिपी खूप सोपी
Kkhushi Niramish
उन्हाळ्यात कायमच काही तरी थंड पदार्थ पिण्यासाठी आपल्याला आवडते. किंबहुना आपल्या शरीराची ती गरज असते. अशावेळी झपपट होणारे बडीशेपचे सरबत करून प्या. हे खूप आरोग्यदायी असते. | All Photo YouTube @menupleasekanchan
बडीशेपच्या सरबतसाठी सर्वप्रथम मिक्सरमधून बडीशेप, खडीसाखर आणि विलायची बारीक करून त्याची पावडर तयार करून घ्या.
ही पावडर तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीत ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला पुढील वेळी केव्हाही इन्स्टंट बडीशेपचे सरबत करू शकता.
एक ग्लास बडीशेपचे सरबत करण्यासाठी दोन चमचे बडीशेप-खडीसाखर आणि विलायची बारीक करून तयार केलेली पावडर घ्या. यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ घाला.
या मिश्रणात अर्धा लिंबू पिळून घ्या.
यामध्ये गार पाणी घालून मिश्रण ढवळून घ्या.
हे मिश्रण काचेच्या बरणीत किंवा ग्लासमध्ये छान गाळून घ्या.
एक वाटी पाण्यात सब्जा किंवा चिया सीड्स भीजवा. या बिया फुलल्या की ते बडीशेपच्या सरबतमध्ये अॅड करा.