टॅनिंगपासून त्वचेचा बचाव कसा कराल? सनस्क्रीन वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागताच त्वचेच्या समस्या वाढतात. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
टॅनिंग, सनबर्न, काळपटपणा आणि त्वचा कोरडी पडण्याच्या तक्रारी वाढतात.
म्हणून घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे त्वचेच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, बाहेर जाण्याच्या किमान १५ ते २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे.
फक्त चेहऱ्यावर नाही तर मान, हात, कान आणि पाय यांसारख्या उघड्या भागांवरही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
दर २ ते ३ तासांनी पुन्हा लावा. घाम आल्यास किंवा चेहरा धुतल्यास सनस्क्रीन पुन्हा लावणे महत्त्वाचे असते.
योग्य SPF निवडा. SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन UVA आणि UVB किरणांपासून संरक्षण देते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)