Summer Travel Guide : मार्च ते मेमध्ये महाराष्ट्रात नक्की भेट द्यावीत अशी ‘ही’ ७ सुंदर ठिकाणे
Mayuri Gawade
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच अनेकजण थंड हवामान असलेल्या ठिकाणांच्या शोधात असतात.
सह्याद्री पर्वतरांगांपासून ते सातपुडा डोंगरांपर्यंत महाराष्ट्रात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जिथे उन्हाळ्यातही आल्हाददायक वातावरण अनुभवता येते. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशीच काही लोकप्रिय पर्यटनस्थळे.
महाबळेश्वर - सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. वेण्णा लेक, आर्थर सीट आणि हिरव्यागार दऱ्यांमुळे हे ठिकाण पर्यटकांना विशेष आकर्षित करते.
| Picasa
माथेरान - रायगड जिल्ह्यातील माथेरान हे महाराष्ट्रातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. दाट जंगल, लाल मातीचे रस्ते आणि सुंदर व्ह्यू पॉईंट्समुळे येथे शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो.
भंडारदरा - अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे धरण, तलाव आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. आर्थर लेक आणि रंधा फॉल्स पाहण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
पाचगणी - सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे शांत आणि निसर्गरम्य हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. टेबल लँड, सिडनी पॉईंट आणि सुंदर दऱ्यांचे दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
अंबोली - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली हे सह्याद्रीतील थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. धबधबे, दाट जंगल आणि अंबोली घाटामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास ठरते.
चिखलदरा - विदर्भातील एकमेव हिल स्टेशन असलेले चिखलदरा हे मेळघाटच्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सनसेट पॉईंट आणि भीमकुंड ही येथे पाहण्यासारखी प्रमुख ठिकाणे आहेत.
तोरणमाळ - नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले सुंदर हिल स्टेशन आहे. यशवंत लेक आणि हिरव्यागार डोंगरांमुळे येथे शांत आणि थंड वातावरण अनुभवता येते.
| सर्व छायाचित्रे : पिंटरेस्ट/ यांडेक्स