रोज सनस्क्रीन लावता? मग 'या' चुका करणं लगेच थांबवा

किशोरी घायवट-उबाळे

सनस्क्रीन फक्त उन्हात बाहेर पडताना लावणे ही सर्वात सामान्य चूक आहे.
चेहऱ्यावर सनस्क्रीनचे खूप कमी प्रमाण वापरल्याने त्वचेला अपेक्षित संरक्षण मिळत नाही.
सनस्क्रीन लावल्यानंतर लगेच घराबाहेर पडणे टाळावे. ते त्वचेवर व्यवस्थित बसण्यासाठी थोडा वेळ द्यावा.
फक्त चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून मान, कान आणि हातांकडे दुर्लक्ष करू नये.
घाम आल्यानंतर किंवा बराच वेळ उन्हात राहिल्यानंतर सनस्क्रीन पुन्हा न लावणे हीदेखील मोठी चूक आहे.
मेकअप केला असल्यास सनस्क्रीनची गरज नसते, असा गैरसमज करू नका.
त्वचेच्या प्रकाराला आणि गरजेला योग्य सनस्क्रीन न निवडल्याने त्याचा वापर प्रभावी ठरणार नाही.
ढगाळ वातावरणात किंवा घरात असल्याने सनस्क्रीनची गरज नाही, असे समजणेही चुकीचे ठरू शकते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.) | (सर्व छायाचित्र : Yandex)