भारतीय साड्या, दागिने अन् विणकरांच्या कौशल्याचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक; पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
भारतीय दागिने, साड्या आणि कारागिरांच्या कलेचे कौतुक करत सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
"भारतीय हस्तकलेचं सौंदर्य प्रत्येक वेळी मला भारावून टाकतं," असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले.
भारतीय दागिने, साड्या, त्यावरील नक्षीकाम, रंग आणि डिझाइन्स जगभरात वेगळी ओळख निर्माण करतात, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
जगातील कोणताही देश भारतीय कारागीर आणि विणकरांच्या अप्रतिम कलेची बरोबरी करू शकत नाही, याचाही उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.
भारतीय कारागिरांचे कौशल्य, समर्पण आणि सर्जनशीलता भारताची परंपरा जपते, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
विणकर आणि कारागीर आपल्या कलेतून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
भारतीय हस्तकलेचा अभिमान बाळगा आणि आपल्या कारागीर-विणकरांच्या कलेला प्रोत्साहन द्या, असा संदेश त्यांच्या पोस्टमधून दिला आहे.