पत्र्याच्या घरातून आलिशान घरात सुरज चव्हाणचा गृहप्रवेश; फोटो पाहून व्हाल थक्क!

Mayuri Gawade

बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण सध्या जोरदार चर्चेत आहे.
सध्या सुरजच्या घरी लग्नसराई सुरू आहे. केळवण, लग्नाच्या शॉपिंगदरम्यान त्याने एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे.
सुरजने लग्नाआधी आपल्या नव्या आलिशान घरात प्रवेश केला आहे. नव्या सुनेचा गृहप्रवेश याच घरात करण्याचे त्याने ठरवले आहे.
विशेष म्हणजे हे घर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला दिले आहे.
बिग बॉसमधील विजयानंतर अजित पवारांनी घर देण्याची घोषणा केली होती आणि त्यांनी ती प्रत्यक्षात पूर्णही केली.
हा व्हिडिओ शेअर करत सूरजनं याबद्दल त्यांचे आभार देखील मानले.
सूरजचं दुमजली घर अत्यंत प्रशस्त आणि आधुनिक बांधकामाने सजलेलं आहे.
मोठमोठ्या खिडक्या आणि त्यांना लावलेल्या चकचकीत काचा घराला आलिशान लूक देतात.
हाय सीलिंगमुळे घरात मोकळेपणा आणि भव्यता जाणवते.
प्रवेश करताच दिसणारा मोठा हॉल आणि त्याला लागून असलेलं हायटेक किचन घराचं आकर्षण वाढवतं.
दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोल्या आधुनिक इंटीरियरने सजवल्या असून प्रकाशमान दिसतात.
घराबाहेरचं मोठं अंगण संपूर्ण घराला अधिक सुंदर आणि हवेशीर बनवतं.
सुरजने पत्र्याच्या घरातून मोठ्या आलिशान घरात पदार्पण केल्याने चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.