'स्वप्नसुंदरी'ची रोमँटिक झलक; भूषण-सायलीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत

किशोरी घायवट-उबाळे

'स्वप्नसुंदरी' चित्रपटातून भूषण प्रधान आणि सायली पाटीलची फ्रेश जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
२४ जुलैला होणार प्रदर्शित - रोमँटिक कथा आणि नव्या जोडीच्या केमिस्ट्रीमुळे 'स्वप्नसुंदरी'च्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
व्हाइट लूकने वेधलं लक्ष - समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघांनीही पांढऱ्या रंगाचे मॅचिंग आउटफिट्स परिधान करत खास रोमँटिक अंदाज साकारला आहे.
गुलाबासह खास रोमँटिक क्षण - सायलीच्या हातातील लाल गुलाब रोमँटिक अंदाजाला पुरेपूर शोभून दिसत आहे.
ऐतिहासिक वास्तूच्या साक्षीने फोटोशूट - भव्य ऐतिहासिक पार्श्वभूमीवर दोघांचे हसरे आणि रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा - चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच भूषण आणि सायलीची केमिस्ट्री चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे.
'स्वप्नसुंदरी'ची उत्सुकता शिगेला - प्रेम, सुंदर लोकेशन्स आणि नव्या जोडीच्या आकर्षणामुळे 'स्वप्नसुंदरी' पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.