सतत गोड खायची इच्छा होते? शरीरातील 'या' बदलांकडे लक्ष द्या

Mayuri Gawade

दिवसभरात कधी ना कधी काहीतरी गोड खावंसं वाटतं? ही केवळ सवय नसून त्यामागे काही महत्त्वाची कारणं असू शकतात.
सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर शरीर ऊर्जा किंवा पोषणाची मागणी करत असल्याचा तो संकेत असू शकतो.
झोपेची कमतरता हे गोड खाण्याच्या वाढत्या इच्छेमागील एक मोठं कारण मानलं जातं.
जास्त ताणतणावामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात आणि गोड पदार्थांची क्रेव्हिंग वाढू शकते.
वेळेवर जेवण न करणे किंवा जेवणातील पोषणमूल्यांचा अभावही स्वीट क्रेव्हिंग्ज वाढवू शकतो.
प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्सयुक्त आहार घेतल्यास पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते.
पुरेसं पाणी न पिल्यास तहान आणि भूक यामध्ये गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा वाढू शकते.
गोड खायची इच्छा झालीच तर मिठाईऐवजी फळं, खजूर, गूळ किंवा डार्क चॉकलेटचा पर्याय निवडा.
योग, ध्यान, चालणे आणि पुरेशी झोप यामुळे ताण कमी होतो आणि गोड खाण्यावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं. | All Photos : Ai Generated