पावसाळ्यात दरवाजा फुगलाय म्हणून लगेच सुताराला बोलवू नका; आधी हे घरगुती उपाय करून पाहा
Mayuri Gawade
सलग पाऊस आणि दमट हवामानामुळे लाकडी दरवाजे व खिडक्या ओलावा शोषून फुगतात, त्यामुळे ते उघडताना आणि बंद करताना अडथळा निर्माण होतो.
दरवाजा फुगल्यामुळे अडकतोय की स्क्रू सैल झाल्यामुळे, हे आधी नीट तपासा. अनेकदा फक्त स्क्रू घट्ट केल्यानेही समस्या दूर होते.
दरवाजा चौकटीला घासत असेल तर त्या भागावर साबण किंवा मेणबत्ती चोळा. यामुळे घर्षण कमी होऊन दरवाजा सहज सरकू लागतो.
घरात रूम हिटर असल्यास काही वेळ तो चालू ठेवा. उष्णतेमुळे ओलावा कमी होऊन फुगलेला दरवाजा पूर्ववत होण्यास मदत मिळू शकते.
दरवाज्याचा एखादा भाग जास्त फुगला असेल तर तो सॅण्डपेपरने हलक्या हाताने घासल्यास दरवाजा पुन्हा सहज लागण्यास मदत होते.
पावसाळ्यात वारंवार ही समस्या होत असेल तर दरवाज्यावर वेळेवर वॉर्निश किंवा पीयू कोटिंग केल्यास लाकूड ओलावा कमी शोषते.
फुगलेला दरवाजा जबरदस्तीने ढकलू किंवा ओढू नका. त्यामुळे दरवाजा, चौकट किंवा बिजागर खराब होण्याचा धोका वाढू शकतो.
लाकडी दरवाज्याभोवतीचा भाग शक्य तितका कोरडा ठेवा. घरातील ओलावा कमी राहिल्यास दरवाजे फुगण्याची शक्यता कमी होते.
हे सोपे घरगुती उपाय वेळेवर केल्यास सुताराला बोलवण्याची गरज पडणार नाही आणि दुरुस्तीचा खर्चही सहज वाचू शकतो. | All Photos : AI Generated