दररोज पुरेशी झोप घ्या, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

Suraj Sakunde

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टींचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. अनेक लोकांना शांत झोप लागत नाही.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दररोज साधारणपणे ७ ते ८ तासांची झोप घ्यायला हवी.

जर तुम्ही जास्त काळापासून ६ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.

जर तुम्ही ६ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतो. कमी झोपेमुळं डोळ्यांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, कमी झोपेमुळे तुमच्या मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळं तुम्ही स्मृतिभ्रंश होऊ शकतो.

जर तुम्ही ६ तासांपेक्षा कमी झोपत असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या इतर कामांवर होतो.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते अनेक मानसिक आजारांमागचं कारण हे कमी झोप आहे. जर तुम्ही शांत झोप घेतली, तर तुम्ही तणावमुक्त राहू शकता.

कमी झोपेचा परिणाम पचनसंस्थेवर होऊ शकतो.

काही अभ्यासांनुसार, दररोज ७-८ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह इत्यादी आजार होऊ शकतात.