पावसाळ्यात घ्या स्वतःची काळजी, फॉलो करा 'या' ५ सोप्या टिप्स

Suraj Sakunde

कडक उन्हाळ्यानंतर आता पावसाळा सुरु झाला आहे.

पावसामुळं गरमीच्या प्रकोपापासून सुटका होते, परंतु त्याचवेळी काही आजारांचा धोकाही असतो.

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. त्यामुळं वडिलधारी मंडळी या दिवसांत खाण्यापिण्याच्या बाबतीत काळजी घ्यायला सांगतात.

आज आपण पावसाळ्यात फिट कसं राहायचं, याच्या काही टिप्स पाहणार आहोत.

पावसाळ्यात आजारांच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

पावसाळ्यात सालाद किंवा कच्च्या भाज्यांचे सेवन करणं टाळावं किंवा विशेष काळजी घ्यावी.

बाहेरचे पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाणं टाळावं. घरच्या जेवणाला प्राधान्य द्यावं.

आल्याचा चहा, तुळसीचा चहा किंवा सुप इत्यादी गरम पदार्थांचं सेवन करावं.

पावसाळ्यात मासे किंवा सीफूड खाणं टाळा कारण ते संक्रमित असण्याची शक्यता असते.