Tamannaah Bhatia : तमन्नाचा नवा लूक व्हायरल; 'जयश्री'च्या भूमिकेत दिसला जुना फिल्मी ग्लॅमर! पाहा Photos

Mayuri Gawade

दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (Tamannaah Bhatia)
व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये ती ‘जयश्री’ची भूमिका साकारत आहे.
या बहुचर्चित बायोपिकचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं.
त्या पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या तमन्नाच्या ‘जयश्री’ लूकनं सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.
तमन्नाची ही भूमिका तिच्या करिअरमधील सर्वाधिक वेगळी आणि आव्हानात्मक मानली जाते.
या पोस्टरमध्ये ती पारंपरिक नऊवारी साडी आणि क्लासिक दागिन्यांमध्ये दिसते. जुना फिल्मी ग्लॅमर आणि शांत, सोज्वळ व्यक्तिमत्त्व तिच्या लुकमधून झळकते.
फिकट गुलाबी साडीतला तमन्नाचा हा लूक पाहताच फॅन्सनी इंस्टाग्रामवर रेड हार्ट इमोजींचा अक्षरशः वर्षाव केला.
“तिला या भूमिकेत पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत”, “परफेक्ट कास्टिंग!” अशा कमेंट्सनी पोस्ट भरून गेली.