टम्म फुगलेली भाकरी हवी? थापताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Mayuri Gawade
भाकरी मऊ आणि पातळ हवी असेल तर पीठ मळताना पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे.
भाकरीचे पीठ घट्ट न ठेवता कोमट पाण्याने मऊ आणि एकजीव मळल्यास भाकरी थापणे सोपे जाते.
पीठ मळून झाल्यानंतर काही मिनिटे ते झाकून ठेवल्यास त्याला चांगला पोत येतो आणि भाकरी थापताना पीठ सहज पसरते.
भाकरी थापताना मोठा गोळा घेण्याऐवजी छोटा गोळा घेऊन तो हलक्या हाताने मध्यापासून बाहेरच्या दिशेने पसरवावा.
भाकरी पातळ करण्यासाठी जास्त जोर लावण्याची गरज नसते; हाताची बोटे आणि तळहात वापरून लयबद्धपणे थापल्यास ती छान पसरते.
भाकरी तव्यावर टाकण्यापूर्वी तवा पुरेसा गरम असणे गरजेचे आहे, अन्यथा भाकरी जास्त वेळ भाजल्याने कोरडी होऊ शकते.
भाकरी तव्यावर टाकल्यानंतर तिच्या वरच्या बाजूला थोडे पाणी लावून ते व्यवस्थित पसरवल्यास भाकरी तव्यावर चांगली बसते.
दोन्ही बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर भाकरी थेट गॅसच्या आचेवर ठेवल्यास ती छान फुगण्यास मदत होते.
तयार भाकऱ्या मऊ कापडात गुंडाळून ठेवल्यास त्या अधिक वेळ मऊ राहतात आणि जेवताना त्यांची चवही छान लागते. | All Photos : AI Generated