कम्फर्ट आणि स्टाइलचा परफेक्ट कॉम्बो; ट्रेंडी टँक टॉपचे 'हे' प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?
किशोरी घायवट-उबाळे
टँक टॉप हा एक असा परफेक्ट पर्याय आहे, जो फॅशन आणि कम्फर्ट यांचा मेळ घालतो. योगा क्लासला जाताना, पार्टीसाठी तयार होताना किंवा साडीवर फ्युजन लूक देताना टँक टॉप नेहमीच उपयोगी ठरतो. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
फक्त इनरवेअर म्हणून ओळख असलेला टँक टॉप आज एक स्टाइल स्टेटमेंट बनला आहे. बदलत्या फॅशन ट्रेंड्समध्येही त्याची लोकप्रियता कायम आहे.
क्लासिक क्रू-नेक टँक टॉप
गोल गळ्याचा साधा आणि कायम ट्रेंडमध्ये असलेला हा प्रकार. दमट हवामानासाठी कॉटन मटेरियल योग्य ठरते.
ब्लाउज-स्टाइल स्लीव्हलेस टँक
थोडा स्ट्रक्चर्ड डिझाइन असलेला हा प्रकार साडीसोबत उत्तम दिसतो. लग्नासाठी सिल्क टँक टॉप, तर रोजच्या वापरासाठी कॉटन टँक उत्तम पर्याय.
रेसरबॅक टँक टॉप
Y-शेप डिझाइनमुळे खांद्यांना मोकळेपणा मिळतो. जिमसाठी हा प्रकार लोकप्रिय असून, हाय-वेस्ट पलाझोसोबत स्टायलिश लूक देता येतो.
स्पॅगेटी किंवा कॅमिसोल टँक
बारीक स्ट्रॅप्समुळे हा प्रकार अधिक आकर्षक दिसतो. शियर टॉपखाली किंवा स्कर्टसोबत घालण्यासाठी योग्य. लेसमुळे अधिक एलिगंट लूक मिळतो.
मॉक नेक / टर्टलनेक टँक
उंच गळ्याचा हा प्रकार थोडा मॉडेस्ट आणि हिवाळ्यासाठी योग्य ठरतो. साडीवर किंवा लेयरिंगसाठी वापरता येतो.
ओव्हरसाइज्ड किंवा क्रॉप टँक
Gen Z ट्रेंडमध्ये असलेला हा प्रकार. क्रॉप टँक धोती पॅंटसोबत फेस्टिव लूक देतो, तर ओव्हरसाइज्ड टँक बीच किंवा कॅज्युअल वापरासाठी परफेक्ट ठरतो.
कम्फर्ट आणि वेगवेगळ्या स्टाइलमध्ये सहज बसणारा हा टॉप आजही फॅशनचा 'ऑल-टाइम फेव्हरेट' आहे. म्हणूनच, फॅशन कितीही बदलली तरी टँक टॉपचा चार्म कमी होणार नाही.