गुलाबी नऊवारी अन् मराठमोळा साज; तन्वी मुंडलेचा मंगळागौरी स्पेशल लूक सोशल मीडियावर व्हायरल
किशोरी घायवट-उबाळे
मंगळागौरीच्या निमित्ताने अभिनेत्री तन्वी मुंडले हिने खास पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.
नऊवारी साडी, हिरवी-गुलाबी रंगसंगती आणि पारंपरिक दागिन्यांनी तिचा लूक खुलून दिसतोय.
नथ, ठुशी आणि बांगड्यांचा साज यामुळे तिचा लूक आणखी शोभून दिसतोय.
हिरव्या रंगाच्या भरजरी ब्लाऊजवर केलेली नक्षी लक्ष वेधून घेत आहे.
पारंपरिक लूकसोबत तन्वीने केसांची वेणी घालून ज्वेलरीने सजवल्याचे पाहायला मिळत आहे.
नऊवारी साडी आणि पारंपरिक लूकसोबत तन्वीचा साधा आणि मोहक मेकअप चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
सध्या तन्वी 'स्टार प्रवाह' वरील 'विसरू नको तू मला' या मालिकेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.