भारताचा इंग्लंडकडून मोठा पराभव, पाहा आजच्या सामन्यातील काही दृश्य

वृत्तसंस्था

इंग्लंडने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताचा तब्बल १० गडी राखून दारूण पराभव करत अंतिम फेरीत जागा निश्चित केली

बटलरने पहिल्या षटकात तीन चौकार ठोकत नाबाद ८० करत इंग्लंडला दहा गड्यांनी विजय मिळवून दिला

अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतक झळकावली, त्याचबरोबर शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला

दोघांनीदेखील भारतीय गोलंदाजांची पिसे काढत आपापली अर्धशतके पूर्ण केली.

अंतिम सामना हा पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे रंगणार 

विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे स्पर्धेतील चौथे अर्धशतक ठरले. त्याने ५० धावांची खेळी केली

हार्दिक पंड्याने अखेरच्या चार षटकात अक्षरशः इंग्लिश गोलंदाजांची धुलाई केली, ४ चौकार व ५ षटकारांसह ३३ चेंडूवर ६३ धावा केल्या

भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते

इंग्लंडने १० गडी राखून टीम इंडियाचा दारूण पराभव केला. भारतीय संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला.